
सामना ऑनलाईन । जेनिंग्स काऊंटी
सोने, चांदी, हिरे महागड्या वस्तू चोरल्याचे आपण अनेकदा ऐकले असेल मात्र एका महिलेने चक्क दुसऱ्या महिलेची कवळी चोरल्याचे समोर आले आहे. जेनिंग्स काऊंटी शहरात हा प्रकार घडला असून जोएन क्लिडर्स असे त्या चोरट्या महिलेचे नाव आहे. महिलेची कवळी चोरणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे.
जोएन हीच्या विरोधात एका महिलेने जेनिंग्स काऊंटी पोलीस ठाण्यात कवळी चोरल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता जोएन ही नोकरीच्या मुलाखतीसाठी एका कंपनीत गेली होती. त्या कंपनीत देखील मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला जोएनने लावलेली कवळी तिची नसल्याची शंका आली होती. दरम्यान पोलिसांनी जोएनचा शोध घेत तिला अटक केली असून तिने लावलेल्या कवळीवर त्या कवळीच्या मालकीणीचे नाव लिहिलेले होते. पोलिसांनी जोएनवर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

























































