ब्रिटनमध्ये एका तरुणीने तिच्या एक्स बॉयफ्रेंडचा 5 हजार 900 कोटी रुपयांचा बिटकॉईन कोड असलेला ड्राईव्ह कचऱयात फेकून दिला. हाफिना एडी-इव्हान्स असे या तरुणीचे नाव आहे. तिने दहा वर्षांपूर्वी तिचा एक्स बॉयफ्रेंड जेम्स हॉवेल्सने तिला साफसफाई करताना कचरा फेकण्यास सांगितले. यावेळी तिने कचऱयासोबत बिटकॉईनचा कोड असलेला ड्राइव्ह फेकून दिला. कचऱयातून शोधणे याला आता अवघड आहे. हॉवेल्सने 2009 मध्ये 8,000 बिटकॉईन्सचे माइनिंग केले होते, परंतु नंतर क्रिप्टो कोड असलेली हार्ड ड्राईव्ह हरवल्याचे लक्षात आले. ज्या ठिकाणी हार्ड ड्राईव्ह फेकले आहे त्या ठिकाणी हॉवेल्सने अनेक वेळा न्यूपोर्ट सिटी कौन्सिलकडे लँडफिलचे उत्खनन करण्याची परवानगी मागितली आहे. हार्ड ड्राइव्ह सापडल्यास, तो न्यूपोर्ट ब्रिटनचे दुबई किंवा लास वेगास बनवण्यासाठी त्याच्या संपत्तीपैकी 10 टक्के संपत्ती दान करणार आहे, असे हॉवेल्सने म्हटले. सध्या त्याची कायदेशीर लढाई सुरू असून या प्रकरणाची सुनावणी डिसेंबरच्या सुरुवातीला होणार आहे.
एका बिटकॉईनची किंमत 80 लाख
सध्या मार्केटमध्ये एका बिटकॉईनची किंमत ही 80 लाख रुपयांहून अधिक आहे. हॉवेल्सकडे तब्बल 8 हजार बिटकॉईन्स आहेत. म्हणजेच त्याच्या बिटकाईन्सची किंमत आजघडीला जवळपास सहा हजार कोटींच्या घरात आहे.