
लॉटरीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या महिलेला अखेर शाहूनगर पोलिसांनी अटक केली. अनिता विश्वकर्मा असे तिचे नाव असून तिच्या दुसऱया साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.
माहीम येथे सुरेश मरिअप्पा राहतात. एप्रिल महिन्यात अनिता आणि तिचा दुसरा साथीदार हे दोघे सुरेशच्या इमारतीत आले. आपण एका पंपनीतून आलो असून कंपनीने नवीन लॉटरी सुरू केली आहे. बक्षीस म्हणून लॅपटॉप, मोटरसायकल, मिक्सर, ग्राईंडर अशा वस्तू मिळणार आहेत असे भासवले. लॉटरीचे कुपन व्रेच केल्यावर काही वेळातच बक्षीस दिले जाईल अशा भूलथापा मारल्या. त्या लॉटरीच्या तिकिटाची किंमत दोन हजार रुपये असून जर बक्षीस लागले नाही तर 500 रुपये परत मिळणार अशा त्याने भूलथापा मारल्या. त्यावर विश्वास ठेवून सुरेशने लॉटरीचे तिकीट खरेदी केली.
सुरेशला लॉटरीच्या तिकिटात लॅपटॉप लागला. लॅपटॉप लागल्यावर सुरेशने त्याला संपर्क केला. त्यानंतर वस्तू हवी असल्यास खाली चला असे सांगून ते दोघे निघून गेले. सुरेश त्याच्यासोबत खाली आले. त्या दोघांनी सुरेशची नजर चुकवून पळ काढला. फसवणूक केल्याप्रकरणी सुरेशने शाहूनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक अशोक ठुबे यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक अमोल चव्हाण याने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. एका फुटेजमध्ये पोलिसांना अनिता दिसली. ती कल्याण येथे असल्याचे समजताच पोलिसांचे पथक तेथे गेले. तेथून पोलिसांनी अनिताला ताब्यात घेऊन अटक केली. तिला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली आहे.





























































