ज्येष्ठ महिलेचे 70 हजारांचे दागिने चोरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील वारजे माळवाडी या बस स्थानकावर थांबलेल्या एका ज्येष्ठ महिलेशी गोड बोलून त्यांना स्वारगेट येथे नेऊन त्यांच्याकडील 70 हजार रुपयांचे दागिने चोरून नेण्यात आले आहेत. याप्रकरणी अज्ञात महिलेबद्दल फरासखाना पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार ज्येष्ठ महिला वारजे माळवाडी येथील बस स्थानकावर उभ्या होत्या. त्यावेळी त्यांना एका महिलेने स्वारगेट परिसरात गेल्यावर 2 हजार रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखविले. ती त्यांना रिक्षाने स्वारगेट परिसरात घेऊन आली. रिक्षामध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ आणि रोख साडेसहाशे रुपये गुपचूप काढून घेतले. त्यानंतर पीडित महिलेला पिण्याचे पाणी घेऊन येते, असे म्हणून निघून जात तिची फसवणूक केली आहे.