लखनौत तरुणीचा मृतदेह आढळला नग्नावस्थेत, बलात्कार झाल्याचा अंदाज

उत्तर प्रदेशमध्ये महिलांविरोधात गुन्हे थांबण्याची चिन्हे दिसत नाही. आजच हाथरसमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असताना राजधानी लखनौत एका तरुणीचा मृतदेह नग्नावस्थेत आढळला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणीवर बलात्कार झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

लखनौमधील एका रिकाम्या प्लॉटवर एका अज्ञात तरुणीचा मृतदेह नग्नावस्थेत आढळला आहे. मृतदेहाच्या बाजूला चौकोनी सीमा आखण्यात आली आहे. तरुणीच्या डोक्यावर काही जखमा आढळल्याअ आहेत. सदर तरुणीवर बलात्कार झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या