World cup 2019 दोन गुणांसाठी पाकिस्तानशी खेळू नका, गंभीर संतापला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकामध्ये हिंदुस्थानने पाकिस्तानविरुद्घचा सामना खेळू नये ही मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी ही मागणी केली होती. आता या रांगेमध्ये हिंदुस्थानचा माजी सलामीवीर खेळाडू गौतम गंभीरचे नाव जोडले गेले आहे. हिंदुस्थान-पाकिस्तान लढतीवर गौतम गंभीरने मोठे वक्तव्य करत हा सामना खेळू नये असे म्हटले आहे.

INDvPAK पाकिस्तानला आयते गुण का द्यायचे? खेळा व दारूण पराभव करा – सचिन

हिंदुस्थानने सामना खेळला नाही तर आपण पाकिस्तानला दोन अंक फुकटात देऊ असे वक्तव्य याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने केले होते. परंतु या वक्तव्याच्या अगदी विरोधात गौतम गंभीरने विधान केले असून हिंदुस्थानने दोन अंकांसाठी पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळू नये. दोन अंक मिळाले नाही तर कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. परंतु जर हिंदुस्थानचा संघ सेमीफायनलपर्यंत पोहोचला नाही तर संपूर्ण देशाने त्यांच्यासोबत उभे राहण्याची आवश्यकता असेल. यासाठी संघाला दोष देण्याची आवश्यकता नाही, असेही तो यावेळी म्हणाला.

हिंदुस्थानने फक्त विश्वचषकच नाही तर आशिया कपमध्येही पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळू नये अशा मताचा मी आहे, असे गौतम गंभीर म्हणाला. तसेच माझ्यासाठी हिंदुस्थानच्या जवानांपेक्षा मोठे आणि महत्त्वाचे काहीही नाही, असेही तो म्हणाला. तसेच जे लोक खेळामध्य़े राजकारण आणू नका असे बोलतात त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचंही तो म्हणाला.