World Cup 2019: हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यावरील शोएब अख्तरच्या प्रश्नावर विरूचा षटकार

सामना ऑनलाईन । मुंबई 

हिंदुस्थान आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये 16 जूनला विश्वचषक क्रिकेटमधील पहिला व सर्वात हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. या सामन्याबाबत वातावरण चांगलेच तापू लागले आहे. याच सामन्याबाबत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने त्याच्या यू-ट्यूब चॅनेलवर हिंदुस्थानचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवागसोबत चर्चा केली या चर्चेत सेहवागने शोएबच्या एका प्रश्नावर जोरदार षटकार लगावला.

हिंदुस्थान – पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सामन्यावरून दोन्ही संघांच्या समर्थकांकडून आपलाच संघ जिंकणार असल्याचे दावा केले जात हेत. सेहवागसोबत बोलताना शोएब म्हणाला की, मीडियामध्ये चर्चा आहे की हिंदुस्थान आपल्या सोयीनुसार खेळपट्टी बनवत आहे. यावर आपले काय मत आहे. त्यावेळी सेहवागने त्याच्या स्टाईलने उत्तर देताना एका म्हणीचा दाखला दिला “हत्ती आपल्या चालीने चालत राहतो आणि कुत्रे भुंकत असतात” असे म्हणाला. तसेच जर असे असते तर आम्ही खेळपट्ट्यांवरील सर्व गवत काढून खेळपट्ट्या गुळगुळीत केल्या असत्या. कारण आम्हाला तर गुळगुळीत खेळपट्ट्यांवर खेळण्याची सवय आहे असेही तो म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या