जगातील सर्वात वयस्कर श्वानाचा विश्वविक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अलीकडेच, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने जगातील सर्वात वयस्कर जिवंत श्वानाची इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. या श्वानाने सर्वात जास्त काळ जगण्याचा विक्रम केला. त्याचे नाव टोबीकीथ आणि वय  21 वर्षे आणि 66 दिवस एवढे आहे. मात्र त्याचा विक्रम आता मोडला गेलाय. अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना येथील पेबल्सने नवा विक्रम प्रस्थापित केलाय. पेबल्स नावाच्या श्वानाचे वय 22 वर्षे  आहे. हयात असणारा तो सर्वात वयोवृद्ध श्वान ठरला आहे.

मालकाने रेकॉर्डसाठी अर्ज केल्यानंतर पेबल्सला विश्वविक्रमी शीर्षक बहाल करण्यात आले. 28 मार्च 2000 रोजी जन्मलेल्या पेबल्सचे वय 22 वर्षे 59 दिवस आहे. ‘पेबल्स ही लहान मुलांसारखी आहे. तिला दिवसा झोपायला आवडते आणि ती रात्रभर जागते, असे तिची मालकीण ज्युली ग्रेगरी यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डला सांगितले. पेबल्स प्रत्येक गोष्टीत आमच्याबरोबर असते. चढ-उतार, चांगला आणि वाईट काळ, तिने आमच्यासोबत अनुभवला आहे. ती आमच्या कुटुंबातील एक सदस्य आहे, असेही त्यांनी सांगितले.