चार वर्षांत पृथ्वीचं तापमान दीड अंशांनी वाढणार, जागतिक हवामान संघटनेचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगाचं तापमान वाढत चाललं आहे. जागतिक तापमानवाढ हा एक गंभीर मुद्दा बनला असून त्यावर ठोस उपाय करण्याची गरज निर्माण झाली आहे. यापुढील चार वर्षं ही अजून गंभीर असतील कारण वातावरण दीड अंशांनी आणखी उष्ण होणार आहे, असा इशारा जागतिक हवामान संघटनेने दिला आहे.

संघटनेने दिलेल्या इशाऱ्यानुसार, या तापमानवाढीमुळे संपूर्ण पृथ्वीवर प्रचंड उकाडा जाणवेल. अनेक ऋतुंचे महिने बदलतील. नैसर्गिक आपत्तींचे स्वरूपही बदलेल. त्यांचं प्रमाणही वाढेल. संघटनेने केलेल्या इशाऱ्यानुसार, या तापमानवाढीची शक्यता 66 टक्के इतकी आहे.

ग्लोबल अॅन्युअल टू डिकेडल क्लायमेट अपडेट नावाच्या एका अहवालात हा खुलासा करण्यात आला आहे. दर पाच वर्षांनी जगाचं तापमान वाढेल आणि उष्णतेचे नवनवीन विक्रम प्रस्थापित होतील. ही प्रक्रिया 2016पासून सुरू झाली आहे. हे एक खूप मोठं संकट असून अद्यापही अनेक देश या संकटाबाबत पुरेसे गंभीर नाहीत, असा इशाराही संघटनेने दिला आहे.