
निसर्गरम्य ठिकाणी, समुद्रकिनारी किंवा डोंगरावर आपलेही घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी बंगला असूनही तो सुमारे 100 वर्षे रिकामा असेल तिथे कोणीही राहत नसेल तर आश्चर्य वाटते. अशी ठिकाणांवर दंतकथा किंवा इतर कथा रचण्यात येतात आणि त्या रंगवून सांगितल्या जातात. इटलीतील निसर्गरम्य ठिकाणी असलेला बंगल्यात 100 वर्षांपासून कोणीही राहत नाही. त्याबाबतही अनेक कथा सांगितल्या जातात.
इटलीतील डोलोमाईट पर्वतावर मधोमध एक बंगला बाधण्यात आला आहे. मात्र, या बंगल्यात 100 वर्षांपासून कोणीही राहत नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांसाठी हा बंगला एक रहस्य आहे. या बंगल्याच्या परिसरात पहाड, डोंगर याशिवाय काहीही दिसत नाही. या बंगल्यातून दिसणारा निसर्ग अनेकांना भुरळ पाडतो. मात्र, डोंगरावर निर्जन ठिकाणी 100 वर्षांपूर्वी हा बंगला कसा बांधला असेल, असा प्रश्नही अनेकांना पडतो.
हा बंगला समुद्रसपाटीपासून 9 हजार फूटांच्या उंचीवर आहे. हा बंगला पहिल्या महायुद्धाच्या काळात बांधण्यात आल्याचा अंदाज आहे. इटलीच्या सैनिकांनी ऑस्टो-हंगेरीयन सैन्याशी होणाऱ्या युद्धादरम्यान आराम करण्यासाठी आणि आडोसा म्हणून हा बंगला उभारल्याचा तज्ज्ञांचा कयास आहे. या बंगल्याचा उपयोग ते शस्त्रास्त्रे आणि इतर वस्तू साठवण्यासाठी करत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शत्रूपासून रक्षण होण्यासह सुरक्षित स्थान आणि रसद साठवण्याची त्यांची गरज पूर्ण केली जात होती.
या बंगला वैशिष्टपूर्ण पद्धतीने बांधण्यात आला आहे. हा बांधताना लाकूड, रस्सी आणि केबलचा वापर करण्यात आला आहे. 100 वर्षापेक्षा जास्त काळा झाल्यानंतरही हा बंगला सुस्थितीत आह, हे याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. तसेच या पर्वतांच्या मधोमध आहे. या बंगल्यापर्यंत पोहचण्यासाठी खडतर मार्ग पार करावा लागतो. त्यामुळे इथपर्यंत पोहचणे कठीण आहे. तसेच इथे येण्यासाठी एक लाकडी पूलही आहे. याचा वापर सैनिक करत असावेत, असे तज्ज्ञांचे मत आहे.
या ठिकाणी आल्यावर आपण वेगळ्याच जगात आल्याचा भास होतो. या बंगल्यातून बाहेर बघितल्यावर निसर्गरम्य वाचावरण दिसते. तर खाली बघितले तर या एवढ्या उंचीवर असल्याची भीती वाटते. बंगल्याच्या चारी बाजूंना पर्वत आहेत. त्यामुळे या ठिकाणी जाताना पर्यटकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. साहसी क्रीडा आणि पर्वतारोहण करणाऱ्यांसाठी हे ठिकाण आकर्षक आहे. मात्र, या ठिकाणी पोहचणे जोखमीचे आहे. तसेच इथपर्यंत येण्यासाठी खडतर मार्ग ओलांडावा लागते.



























































