WPL 2026 – मुंबई माझ्यासाठी अतिशय खास आहे… हरमनप्रीत कौरने शहराचं कौतुक करत विजेतेपदाचा निर्धार केला व्यक्त

महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL 2026) मुंबई इंडियन्सच्या संघाने पहिल्या हंगामापासून धमाकेदार कामगिरी केली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात मुंबईने दोन वेळा चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला. यंदाच्या हंगामातही विजेतेपद पटकावण्यासाठी मुंबई सज्ज आहे. 9 जानेवारी रोजी मुंबई आपला पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळणार आहे. तत्पूर्वी मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरने मुंबई शहराचं कौतुक करत मुंबई माझ्यासाठी खास शहर असल्याच म्हटलं आहे.

विश्वचषक विजेत्या संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वाची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज झाली आहे. हरमनप्रीत कौरने यंदाही विजेतेपद उंचावण्यासाठीचा आपला आत्मविश्वास माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. ती म्हणाली की, “नवीन वर्षाची सुरुवात WPL ने होत आहे. संघात तितकाच उत्साह आणि सकारात्कम ऊर्जा आहे. मागील तीन हंगामात आम्ही दोनवेळा चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला आहे. यंदाही आम्ही चांगला खेळ करून ट्रॉफी जिंकण्याचा निर्धार केला आहे.” असं हरमनप्रीत कौर म्हणाली आहे.

WPL 2026 Schedule – महिला प्रीमियर लीगचे वेळापत्रक जाहीर, ९ जानेवारीपासून होणार सुरू

मुंबई शहराचं कौतुक करताना हरमनप्रीत कौर म्हणाली की, “मुंबई हे माझ्यासाठी अतिशय खास शहर आहे. जेव्हा मला इथे (मुंबईत) खेळण्याची संधी मिळते, तेव्हा नेहमीच चांगला आणि सकारात्मक निकाल लागतो. हा हंगामही विशेष ठरेल, अशी मला खात्री आहे.” असं हरमनप्रीत कौर म्हणाली आहे.