ऑलिम्पिक संघटनेचा मोठा निर्णय; कुस्तीपटू महासंघासाठी 3 सदस्यीय समिती केली स्थापन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानाच्या ऑलिम्पिक संघटनेने (IOC) हिंदुस्थानच्या कुस्ती महासंघ (WFI) साठी तीन सदस्यांची समिती स्थापन केली आहे.

भूपेंद्रसिंग बाजवा यांची अध्यक्षपदी, तर सदस्य म्हणून एमएम सोमाया आणि मंजुषा कंवर यांची ऑलिम्पिक संघटनेच्या निलंबनानंतर क्रीडा मंत्रालयाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या समितीच्या अन्य सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती WFI च्या विविध कार्ये आणि उपक्रमांवर देखरेख करेल.

यामध्ये खेळाडूंची निवड, आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडूंची नावे पाठवणे, क्रीडा स्पर्धांचे आयोजन, पर्यवेक्षण आणि बँक खाती व्यवस्थापित करणे यांचा समावेश होतो.