
हिंदुस्तानी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला असून त्यांच्या अटकेसाठी गेल्या दहा दिवसांपासून त्या जंतरमंतरवर आंदोलन करत आहेत. मात्र बुधवारी आंदोलनकर्ते कुस्तीपटू आणि पोलीस यांच्यात बाचाबाची आणि हाणामारी झाली. या घटनेचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. या घटनेबाबत आता राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जयंत चौधरी यांनी ट्वीटच्या प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, ”जंतर मंतर येथे पोलिसांकडून कुस्तीपटू आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. हे आमच्या मानसन्मानाच्या विरोधात आहे. लेकीबाळींच्या अधिकारासाठी देशातील बंधू-भगिनींनी पुढे यायला हवे. पुढे त्यांनी लिहीलेय की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या खासदाराला का नाही राजीनामा देण्यास सांगत आहेत. देश कुस्तीपटूंचा अपमान अजिबात सहन करणार नाही.’
सूत्रों द्वारा खबर मिल रही है की जंतर मंतर पर पुलिस द्वारा पहलवानों और सहयोगियों पर वार हुआ है। ये हमारे मान सम्मान के साथ सीधा खिलवाड़ है!
बहन बेटी के अधिकारों के लिए हमारे देश के भाइयों और बहनों को आगे आना ही होगा!
सुबह जंतर मंतर जाऊँगा!
— Jayant Singh (@jayantrld) May 3, 2023
मोदी जी क्यों नहीं बोल देते अपने सांसद को की इस्तीफ़ा दे दो नैतिक आधार पर!
देश पहलवानों के अपमान को नहीं सहेगा!
— Jayant Singh (@jayantrld) May 3, 2023
सोशल मीडियावरील एका व्हिडिओमध्ये काही आंदोलक एका पोलीस कर्मचाऱ्याने दारूच्या नशेत दोन कुस्तीपटूंवर हल्ला केल्याचा आरोप करताना ऐकू येत आहेत. व्हिडिओमध्ये आरोपी पोलीस बसलेला दिसत आहे, तर इतर पोलीस यावेळी बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप आंदोलक करत आहेत. माजी कुस्तीपटू राजवीर म्हणाला, पावसामुळे गाद्या ओल्या झाल्या, म्हणून आम्ही झोपण्यासाठी ‘फोल्डिंग’ कॉट आणत होतो, पण पोलिसांनी परवानगी दिली नाही. दारूच्या नशेत असलेले पोलीस कर्मचारी धर्मेंद्र यांनी विनेश फोगट यांना शिवीगाळ करत आम्हाला मारहाण केली. पुढे तो म्हणाला, त्यांनी आम्हाला मारहाण करायला सुरुवात केली. बजरंग पुनियाचे नातेवाईक दुष्यंत आणि राहुल यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. एवढेच नाही तर पोलिसांनी डॉक्टरांनाही घटनास्थळी येऊ दिले नाही. तर लेडी कॉन्स्टेबलनेही आमच्याशी गैरवर्तन केले. तर कुस्तीपटू विनेश फोगट हिनं घडल्या प्रकारासंदर्भात अनेक गंभीर आरोप केले आहेत.
























































