‘शाओमी’चा 5G स्मार्टफोन येतोय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सॅमसंग आणि Huawei सारख्या कंपन्यांनी आपले 5 जी स्मार्टफोन बाजारात लॉन्च केले आहेत. आता या कंपन्यांच्या पाठोपाठ चीनची मोबाइल फोन निर्माता कंपनी शाओमी ही येत्या 10 डिसेंबरला 5 जी तंत्रज्ञानावर आधारित आपला नवीन स्मार्टफोन ‘रेडमी के 30’ बाजारात आणणार आहे. शाओमी हा स्मार्टफोन 66 वॅट फास्ट चार्जिंग फीचरसह घेऊन येणार आहे.

तसेच शाओमी आपल्या नोट 10 सीरिजचा नवीन स्मार्टफोन 5 जी तंत्रज्ञानसह 2020 मध्ये हिंदुस्थानात लॉन्च करू शकते. या सीरिजमध्ये 100 वॅट सुपर चार्ज ट्राबो फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानचा वापर करण्यात येणार आहे. कंपनीने दावा केला आहे की, या टेक्नोलॉजीच्या साहाय्याने 4,000 एमएएचची बॅटरीला 17 मिनिटात पूर्ण चार्ज करता येईल.