
Xiaomi कंपनीचा Xiaomi 11T हा फोन लवकरच एका व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये लॉन्च होणार आहे. त्यापूर्वी या फोनचे फीचर लीक झाले आहेत. या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला असून 33 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टही देण्यात आला आहे.
Xiaomi 11T चा मॉडेल क्रमांक K16A असू शकतो. या फोनमध्ये 5G असणार आहे. तसेच हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि सेल्फी कॅमेर्यासाठी होल पंच डिजाईन देण्यात येणार आहे. या फोनची खासियत म्हणजे फोनमध्ये 50 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. तर फोनमध्ये 33 वॅट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे फोन लवकरच चार्ज होणार आहे. फोन्मध्ये मीडियाटेक डायन्मेसिटी सीरीज प्रोसेसर असण्याची शक्यत आहे.
हा फोन कुठल्या मॉडेलच्या स्वरुपात लॉन्च होणार आहे की सीरीजमध्ये हे अद्याप कळालेले नाही. तसेच या फोनची किंमतही अजून कळालेली नाही.
























































