पाच तासांचा प्रवास होणार 10 मिनिटात, यमुनोत्री रोप वेला केंद्राची मंजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंड येथील यमुनोत्री मंदिरापर्यंतचा प्रवास पूर्ण करण्यासाठी भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पण, आता या अडचणीतून सुटका मिळणार आहे. कारण, सुमारे दशक भराच्या प्रतीक्षेनंतर यमुनोत्री मंदिरापर्यंतच्या रोपवेला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

यमुनोत्री मंदिराला खरसाली गावाशी जोडणाऱ्या योजनेसाठी सरकार 3.8 हेक्टर जमीन हस्तांतरित करणार आहे. रोपवे बनून तयार झाल्यानंतर ज्या प्रवासाला पाच तास लागतात, तोच प्रवास अवघ्या 10 मिनिटात पूर्ण होऊ शकेल. यामुळे इंधन आणि वेळ या दोघांची बचत होईल.

यात्रेकरूंना यमुनोत्री मंदिरापर्यंत जाणाऱ्या पाच किमी रस्त्यासाठी 3.7 किमी लांबीचा रोपवे बनवण्यात येणार आहे. तो यात्रेचा वेळ वाचवेलच शिवाय वयस्कर यात्रेकरूंसाठी खूप सोयीचा ठरणार आहे. या रोप वेच्या कामाची सुरुवात एप्रिलपासून करण्यात येईल. 2022मध्ये या यात्रेत 81 यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. त्यामुळे यात्रेकरूंमध्ये आनंदाचं वातावरण आहे.