
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
भाजपत असूनही त्यांच्यापासून वेगळे झालेले यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे. जम्मू-कश्मीरमध्ये ज्या घटना झाल्या त्याचा फायदा निवडणुकीत उछलण्यासाठी भाजप आता आटापिटा करेल असं भाकीत त्यांनी वर्तवलं आहे. या घटनेनंतर देशात धार्मिक उन्माद वाढवण्यासाठीही प्रयत्न केला जाईल अशी भीतीही त्यांनी वर्तवली आहे. देशात दंगली झाल्या तर मतांचे ध्रुवीकरण होईल आणि त्याचा फायदा भाजपला होईल असं सिन्हा यांना वाटत आहे.
एका हिंदी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सिन्हा म्हणाले की ही आघआडी मोडणारच होती. आघाडी ज्या पक्षांची झाली, त्यांची विचारधारा परस्परविरोधी होती. यामुळे जम्मू कश्मीरचं प्रचंड नुकसान झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. जम्मू-कश्मीरमध्ये ताबडतोब निवडणुका घेतल्या पाहीजेत अन्यथा तिथल्या जनतेला निवडणुकीतीला लाभासाठी आपल्याला फक्त प्यादं म्हणून वापरल्याची भावना प्रबळ होईल अशी भीतीही त्यांनी वर्तवली आहे.
























































