शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना आक्रमक, यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यांत चक्काजाम आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भामराजा येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेकडून गुरुवाकरी यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यांमध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी राज्यमंत्री संजय देशमुख, माजी आमदार विश्वास नांदेकर, माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार, जिल्हाप्रमुख संतोष ढवळे, संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी आणि इतर प्रमुख नेते उपस्थित होते.

यावेळी शिवसैनिक आणि शेतकऱ्यांकडून राज्य सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या कापसाला त्वरित प्रतिक्विंटल 10 हजार रुपयांचा हमी भाव जाहीर करा, तसेच कापसाची त्वरित खरेदी चालू करावी, सोयाबीनला प्रति क्विंटल 7 हजार रुपये हमी भाव जाहीर करावा, शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यात यावी, शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे देण्यात यावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

चक्काजाम आंदोलनामुळे नागपूर-तुळजापूर हायवेवर काही काळ गाड्यांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. त्वरित शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही, तर चक्काजाम आंदोलनापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.