वाघ आणि शेतकरी एकमेकांसमोर उभे ठाकले आणि…. वाचा बातमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसाद नायगावकर, यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील घोन्सा शिवारात मागील दोन वर्षांपासून वाघाचा धुमाकूळ असून, अनेक जनावरांना त्याने ठार केले आहे. त्यानंतर जवळपास वर्षभरापासून या परिसरातून वाघ गायब झाला होता; परंतु, बुधवारी पुन्हा घोन्सा परिसरात वाघाचा प्रवेश झाला आहे. शिवारातील एका शेतात चक्क वाघ आणि शेतकरी अगदी आमने- सामने आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

वाघाला पाहताच शेतकऱ्याची एकच घाबरगुंडी उडाली व तो तत्काळ झाडावर चढला. त्यानंतर पत्नी व चिमुकल्या मुलांना आवाज देत, त्यांनाही मचाणीवर चढण्यास सांगितले. बुधवारी दुपारी घडलेल्या या थरारक शिवारात घटनेने परिसरात दहशत पसरली आहे. रासा येथील बाळू सिडाम यांचे घोन्सा फुलोरा शिवारात शेत आहे. तेथे प्रकाश मारोती आत्राम आपल्या परिवारासह शेतकाम करत होता. दुपारी अचानक समोर वाघ येऊन उभा चक्क राहिला. त्याला पाहताच प्रकाशची एकच भंबेरी उडाली. वेळ न दवडता तो झाडावर चढला.

समोरच काही अंतरावर पत्नी आणि लहान मुले होती. त्यांना त्याने पटकन काळ मचाणीवर चढण्यास सांगितले. प्रकाश झाडावर चढल्यानंतर वाघ त्या देत, झाडाच्या खाली काहीवेळ उभा होता. प्रकाशला काय करावे ते सुचत नव्हते. मुलेही घाबरुन जीव मुठीत घेऊन मचाणीवर बसली होती. ही माहिती गावकऱ्यांना मिळताच, स्थानिक युवकांनी आरडाओरडा करत शेताकडे धाव घेतली. यावेळी त्यांनी शेतात असलेल्या वाघाला हुसकावून लावले; परंतु, प्रकाशच्या प्रकाशच्या मनात मनात धडकी भरल्याने तो झाडावरून खाली उतरायला तयार नव्हता. काही वेळानंतर गावकऱ्यांनी प्रकाश, त्याची पत्नी व मुलांना सुखरूप बाहेर काढले. या परिसरात वाघाचा प्रवेश झाल्याने शेतकरी व गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने तातडीने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.