यवतमाळ – तुळजापूर मार्गावरील वाहनाने घेतला पेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसाद नायगावकर, यवतमाळ

यवतमाळ तुळजापूर मार्गावर एका टाटा एसला अचानक आग लागली आणि बघता बघता वाहन जळून खाक झाले. ही घटना यवतमाळ पासून काही दूर असलेल्या माळ म्हसोला फाट्याजवळ झाली. पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनाच्या अंतर्गत येणाऱ्या माळ म्हसोला फाट्याजवळ टाटा एस या मिनी ट्रकला अचानकपणे आग लागली. हा ट्रक हिवरी येथून यवतमाळच्या दिशेने सोयाबीनच्र कुटार घेऊन येत होता. म्हसोला फाट्याजवळ अचानक या मालवाहू मिनी ट्रकने पेट घेतला. ही बाब लक्षात येताच चालक मालक असलेले गोपाळ चेके आणि त्यांच्या दोन साथीदारांनी गाडी मधून उड्या मारून आपला जीव वाचविला. या वेळची अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. गाडीला आग लागल्याने रस्त्यावर काही वेळाकरिता घबराटीचे वातावरण होते. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. या आगीत गाडी मालकाचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले, पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.