असं झालं तर…गृहकर्जाचा विमा काढायचा असेल…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गृहकर्ज काढून घर घेताना अनेकदा बँक गृहकर्जाचा विमा काढायला सांगतात. गृहकर्जाचा विमा घेणे रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार अजिबात बंधनकारक नाही.

हा विमा घेण्याचा मुख्य उद्देश तुमच्या पश्चात कुटुंबावर कर्जाचा बोजा पडू नये हा असतो. गृहकर्ज विम्यामध्ये विमा कंपनी उर्वरित गृहकर्जाची परतफेड बँकेला करते.

गृहकर्ज विम्यात ‘रिडय़ुसिंग कव्हर’ प्लॅन निवडा. यात जसजसे तुमचे कर्ज कमी होते तसतसे विम्याचे कव्हरेजही कमी होते आणि त्यानुसार प्रीमियमही योग्य बसतो.

बँकेकडून विमा घेण्याऐवजी तुम्ही स्वतंत्र टर्म इन्शुरन्स घेऊनही गृहकर्ज सुरक्षित करू शकता. टर्म इन्शुरन्स अधिक स्वस्त आणि संपूर्ण कुटुंबाला आर्थिक सुरक्षा देणारा ठरतो.

विम्याचा प्रीमियम कर्जाच्या रकमेत (लोन अमाऊंट) समाविष्ट करून घेऊ नका. असे केल्यास तुम्हाला विम्याच्या रकमेवरही अतिरिक्त व्याज द्यावे लागेल.