
हिंदुस्थानी चलनातील नाण्याच्या बदल्यात मोठी रक्कम मिळणार असल्याचे भासवून ठगाने तरुणाची 22 लाख रुपयांची फसवणूक केली. फसवणूक प्रकरणी पश्चिम सायबर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
तक्रारदार हा अंधेरी येथे राहतो. दहा दिवसांपूर्वी ते सोशल मीडियावर एक रिल्स पाहत होते. तेव्हा त्याना एक जाहिरात दिसली. त्या जाहिरातीमध्ये हिंदुस्थानी चलनातील नाण्यांना खूप भाव मिळणार आहे असे त्यात नमूद होते. त्याखाली एक नंबर होता. कुतूहलाने त्याने त्या नंबरवर पाच नाण्यांचा पह्टो पाठवला. पह्टो पाठवल्यानंतर ठगाने त्याना संपर्क केला. त्या नाण्यांच्या मोबल्यात मोठी रक्कम मिळणार असल्याच्या ठगाने भूलथापा मारल्या.
त्यासाठी आरबीआयमध्ये एक अर्ज करावा लागणार आहे. ठगाने त्याला मोबाईलवर अर्ज पाठवला. सुरुवातीला ठगाने नोंदणीच्या नावाखाली त्यांच्याकडून 699 रुपये घेतले. पैसे पाठवल्यानंतर ठगाने विविध कारण सांगून पैसे उकळण्यास सुरुवात केली. ते पैसे आणून देण्यासाठी एक डिलिव्हरी बॉय नेमला आहे. त्या डिलिव्हरी बॉयच्या नावाखाली एकाने त्याना पुन्हा पह्न केला. गेल्या आठवडय़ात त्याना एकाने पह्न केला. पह्न करणाऱयाने तो दिल्ली सायबर पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे भासवले. पैसे घेऊन येत असलेल्या व्यक्तीला अटक केल्याच्या त्याने भूलथापा मारल्या. जप्त केलेले ते पैसे ब्लॅक मनी असून ते व्हाईट मनी करायचे असल्यास आणखी 6 लाख 30 रुपये द्यावे लागतील असे त्याना सांगण्यात आले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने पश्चिम सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.