दारू पिऊन तर्राट तरुणीचा मध्यरात्री भररस्त्यात धिंगाणा, पोलिसांना मारहाण

दारू पिऊन तर्राट झालेल्या एका तरुणीने मध्यरात्री भररस्त्यात धिंगाणा घातल्याचा प्रकार सानपाडा परिसरात घडला आहे. या तरुणीने ओला चालकाला त्याच्या गाडीच्या बाहेर ढकलून त्याच्या गाडीचा ताबा घेतला. तिला सावरण्याचा प्रयत्न करीत असलेल्या पोलिसांना आणि ओला चालकाला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.

सानपाडा परिसरात पार्टीत दारू पिऊन तर्राट झालेल्या तीन तरुणींनी आपल्या घरी जाण्यासाठी ऑनलाईन ओला कार बुक केली. मात्र या तिघीही तर्राट असल्याने ओला चालकाने त्यांचे भाडे नाकारले. या तिघींपैकी एकीने ओव्हर डोस घेतला होता. ओला चालकाने भाडे नाकारल्यामुळे तिचे स्वतःवरील नियंत्रण हरवले. तिने चालकाला मारहाण करून गाडीच्या बाहेर ओढले आणि त्याच्या गाडीचा ताबा घेतला. नंतर तिने भररस्त्यात आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तिचा हा कारनामा पाहून आसपासचे नागरिक रस्त्यावर आले. या प्रकाराची माहिती सानपाडा पोलिसांना मिळाल्यानंतर तेही घटनास्थळी आले. त्यांनी या तरुणीला सावरण्याचा प्रयत्न केला असता, तिने त्यांना अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी तिला पोलीस ठाण्यात नेले आणि तिच्यावर कारवाईही केली. मात्र या तरुणीच्या कारनाम्याच्या व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

झोमॅटो गर्लसारखी कारवाई होणार का?
हॉटेलमधील पार्सलची डिलिव्हरी करताना रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या झोमॅटो गर्लच्या मोटारसायकलवर वाहतूक पोलिसांनी 2019 मध्ये कारवाई केली होती. त्यावेळी प्रियंका मोगरे या झोमॅटो गर्लचे पोलिसांबरोबर भांडण झाले होते. तिच्या या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्यात तिला एक वर्ष जामीन मिळाला नाही. तशीच कारवाई दारू पिऊन पोलिसांना मारहाण आणि अश्लील शिवीगाळ करणाNया या दारुड्या तरुणींवर होईल का, असा प्रश्नही नवी मुंबईकरांनी उपस्थित केला आहे.