
सामना ऑनलाईन, चेन्नई
विमानात मोदी सरकारविरोधात घोषणा केल्याने एका महिलेस अटक करण्यात आली आहे. सोफीया (२५) असे तिचे नाव आहे. सोफिया ज्या विमानातून प्रवास करत होती त्या विमानात तामिळनाडूतील भाजपचे अध्यक्ष तमिलसाई सुंदरराजनही प्रवास करत होते. त्यांच्यासमोरच तिने मोदी सरकार फाशीवादी असल्याची घोषणा केली. यामुळे तूतीकोरीन विमानतळावर उतरताच तिला अटक करण्यात आली. डीएमके प्रुमुख एमके स्टॅलिन यांनी या घटनेचा निषेध केला आहे. तसेच आपणही भाजप सरकारविरोधात घोषणा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, महिलेला जामिनावर सोडण्यात आले आहे.
#WATCH BJP Tamil Nadu President Tamilisai Soundararajan got into an argument with a co-passenger at Tuticorin airport. The passenger who has now been detained had allegedly raised ‘Fascist BJP Govt down down’ slogan #TamilNadu pic.twitter.com/TzfyQn3IOo
— ANI (@ANI) September 3, 2018
सोफिया कॅनडामध्ये शिक्षण घेत आहे. कॅनडाहून विमानाने ती घरी परतत होती. ती सुंदरराजन यांच्या मागच्या सीटवरच बसली होती. त्यानंतर अचानक ती सीटवरून उठली व भाजप सरकारी फाशीवादी सरकार असल्याची घोषणा देण्यास तिने सुरुवात केली. विमानतळावर आल्यावरही सुंदरराजन व तिच्यात वाद झाला. त्यानंतर तिला अटक करण्यात आली.
भाजपने मात्र या तरुणीचे दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. तर डीमके, सीपीएम, सीपीआय आणि पीएमकेने तरुणीच्या कारवाईवर टीका केली आहे. तरुणीचे या कृत्यावरून तरुण वर्गात भाजप विरोधात राग असल्याचे समोर येत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
summary- youth arrested for shouting anti modi slogans

























































