वेस्ट इंडीज दौर्‍यात युवा खेळाडूंना संधी मिळणार, निवड समितीची बैठक 18 जुलैला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

आगामी वेस्ट इंडीज दौर्‍यात हिंदुस्थानच्या संघात युवा खेळाडूंना संधी मिळणार आहे. हिंदुस्थानच्या सीनियर निवड समितीची बैठक येत्या 18 जुलै रोजी होणार असून यामध्ये वेस्ट इंडीजविरुद्धच्या दोन कसोटी, तीन वन डे व तीन ट्वेण्टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची निवडणार  आहे. या मालिकेत सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

मुंबईकर रोहित शर्माकडे वन डे व ट्वेण्टी-20 संघाचे नेतृत्व सोपविणार आहे. तसेच पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, मयांक अग्रवाल यांना संधीची शक्यता नाकारता येत नाही. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपला सुरुवात होणार असल्यामुळे वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सीनियर खेळाडूंना संघात घेतले जाईल. या मालिकेकडे गांभीर्याने बघितले जाईल.