कांदिवलीत तरुणाची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कांदिवली येथे बाउन्सरची हत्या झाल्याची घटना घडली आहे. दीपक राजभर असे मृताचे नाव आहे. त्याच्या हत्येप्रकरणी समतानगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

दीपक हा कांदिवली पूर्वच्या शिवाजी महाराज मैदानाजवळ राहत होता. तो बाउन्सरचे काम करत होता. आज सकाळी दीपक हा हनुमान मंदिर परिसरातील शौचालयाजवळ रक्ताच्या थारोळय़ात पडला होता. हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात येताच त्याने याची माहिती समतानगर पोलिसांना दिली. काहीच वेळात समतानगर पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी दीपकचा मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवला आहे. त्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

हत्येच्या घटनेनंतर घटनास्थळी श्वान पथक आले होते. त्या आधारे पोलीस मारेकऱयाचा शोध घेत आहेत. दीपकची हत्या पूर्वीच्या वादातून झाल्याचे समजते. त्याला नेमके कोणी मारले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. दीपकविरोधात देखील गुन्हे दाखल असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले. या गुह्याच्या तपासासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. पोलिसांनी काहींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करत आहेत.