चॉकलेट नको, नोकऱ्या द्या! बेरोजगारांच्या संतापाचा उद्रेक, ढिम्म सरकारसमोर लोटांगण!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभा निवडणुकीच्या आधी ‘मुख्यमंत्री युवा कार्य व प्रशिक्षण’ योजनेंतर्गत ट्रेनिंग घेणाऱ्या बेरोजगारांना दहा हजार रुपये मानधन आणि नोकरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केली होती. मात्र 11 महिन्यांचे प्रशिक्षण घेतल्यानंतरही सरकारने कोणतेही आश्वासन पूर्ण केले नसल्याने बेरोजगारांच्या संतापाचा शनिवारी उद्रेक झाला. ‘चॉकलेट नको, नोकऱ्या द्या, मानधन वाढवा’, अशी मागणी करीत बेरोजगारांनी नागपूर विधान भवनावर लोटांगण आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अडवून धरपकड केल्याने तणाव निर्माण झाला.