नगर जिल्ह्यातून दहा हजार युवकांची युवासेनेत नोंद करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

युवासेना ही फक्त युवासेना नसून युवासेवा आहे. युवक हा देशाचा भविष्य आहे. त्यामुळे प्रत्येक युवक हा सक्षम झालाच पाहिजे तरच आपल्या देशाचे भविष्य उज्वल होईल. आजच्या या स्पर्धेच्या जीवनात अनेक अडचणी विद्यार्थ्यांसमोर येत असतात. त्यासाठी प्रत्येक युवक हा युवासेनेचा धागा झाला पाहिजे आणि तो युवासेनेत प्रवाहीत झाला पाहिजे. जेणे करून त्याला त्याच्या अडचणी सोडवता येतील. सर्व युवकांचे तसेच युवतींचे प्रश्न सोडवण्याचे काम युवासेना करत आहे. लवकरच प्रत्येक कॉलेज मध्ये युवासेना कक्ष सुरु होणार आहे. या माध्यमातून नगर जिल्ह्यातून दहा हजार युवकांची युवासेनेत नोंद करणार असल्याचे प्रतिपादन युवासेना जिल्ह्याप्रमुख विक्रम राठोड यांनी केले.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या सारखे नेतृत्व आपल्या महाराष्ट्राला लाभले आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही काम करीत आहोत. युवा पिढीच्या न्याय्य हक्कासाठी लढा उभारून त्यांना या दगदगीच्या जीवनात अडचणी सोडवण्यास मदत करण्याचे काम करतो. आम्ही इतरांसारखे फक्त दोन ते तीन दिवस काम करून थांबत नाही. त्यामुळे युवकांचे प्रश्न युवा सेनेच्या माध्यमातून सूटतील असा विश्वास नगरच्या जनतेला आहे. त्यामुळेच तर युवासेनेच्या नोंदणी अभियानाला युवक उस्फुर्त प्रतिसाद देत आहेत. आम्ही सर्व युवक ऐतिहासिक भुईकोट किल्ला येथे एकत्र येणार असून साफसफाई करून स्वच्छ आणि सुंदर किल्ला करण्याचाही उद्देश आहे.

नगर युवा सेनेच्यावतीने नगर येथील सारडा कॉलेज येथे युवा सेना सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ युवकांना नोंदणी पत्र देऊन जिल्ह्याप्रमुख विक्रम राठोड, यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्ह्याप्रमुख उत्तर रवी वाकळे, मृणाल भिंगारदिवे, शाम सोनवणे, अंकुश चोपडा, ऋषिकेश अष्टेकर, नरेश भालेराव, अक्षय नागापुरे, विकी पवार,निखील भोईर, प्रशांत झामरे, प्रशांत गोसके,विनोद हारबा, जय बिडकर उपस्थित होते.