आपल्या आहारात उडदाची डाळ समाविष्ट करण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या

आहार हा कायम निरोगी असावा हे आपल्याला पूर्वीपासून सांगितले जात आहे. आपल्याजवळ असलेल्या अनेक डाळी आणि कडधान्य आपल्या आरोग्यासाठी उत्तम मानल्या जातात. त्यातीलच एक डाळ म्हणजे उडदाची डाळ.

आपल्या स्वयंपाकघरातील उडदाची डाळ ही प्रथिनांचे भंडार आहे. आपण स्वयंपाकघरातील प्रत्येक डाळींचे महत्त्व जाणून घ्यायला हवे. उडदाच्या डाळीमध्ये असलेल्या प्रथिनांमुळे याला सुपरफूड असेही म्हटले जाते. उडदाची डाळ ही प्रामुख्याने मेदूवडा, डोसा किंवा दाल मखनीपुरती वापरली जाते. परंतु वास्तविक पाहता, या डाळीचे या व्यतिरिक्तही खूप उपयोग आहेत.

कच्ची कैरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा

उडदाच्या डाळीत प्रथिनांचे भांडार असते, विशेषतः शाकाहारी लोकांसाठी एक उत्तम स्रोत आहे. त्यात केवळ उच्च दर्जाचे प्रथिनेच नाहीत तर ते शरीरात स्नायूंच्या वाढीसाठी सुद्धा ही डाळ पोषक मानली जाते.

दररोज १ वाटी उडदाची डाळ खाल्ल्याने, आपल्या शरीराची प्रथिनांची गरज पूर्ण होण्यास मदत होते.

उडदाच्या डाळीत आढळणारे कार्बोहायड्रेट्स शरीराला बराच काळ ऊर्जा प्रदान करतात. म्हणून दिवसाच्या सुरुवातीला किंवा दुपारच्या जेवणात ही डाळ खाणे खूपच फायदेशीर आहे.

आपल्या आरोग्यासाठी ही पीठे आहेत वरदान, वाचा

उडदाची डाळ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. याशिवाय, त्यात असलेले फायबर आणि पोटॅशियम कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.

उडदाच्या डाळीमध्ये कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे देखील आढळतात. यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. ही डाळ विशेषतः महिला आणि वृद्धांसाठी खूप फायदेशीर मानली जाते.

उडीद डाळीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, यामुळे पचन राखण्यास मदत होते. हे बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम देते आणि आतड्यांचे आरोग्य देखील सुधारते.