मीरामार येथील पर्रिकर यांच्या स्मारकासाठी 10 कोटींची तरतुद

32

सामना प्रतिनिधी । पणजी

माजी मुख्यमंत्री  तथा  माजी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचे स्मारक मिरामार किनाऱ्यावर उभारले जाणार असून त्यासाठी दहा कोटी रुपयांची तरतुद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी अर्थसंकल्पावर बोलताना जाहीर केले.

मिरामार येथे स्मारक माजी मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या स्मारका शेजारी पर्रिकर यांचे स्मारक बांधण्याचा संकल्प सरकारने केला होता. मात्र त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतुद आताच करण्यात आली आहे.

दोन दिवसांपूर्वीच पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनीही हा विषय विधानसभेत उपस्थित करताना सरकार जर पर्रिकर यांच्या स्मारकाचे काम  लवकर सुरू करणार नसेल तर आपण लोकसहभागामधून स्मारक बांधून घेईन, असा इशारा  दिला होता. त्यावर स्मारक सरकारच बांधील हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार आता स्मारकासाठी अर्थसंकल्पीय तरतुदही केली गेली.

आपली प्रतिक्रिया द्या