
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे इयत्ता 1 ली ते 8 वी परीक्षा रद्द करण्यात आल्या असल्या तरी इयत्ता 10 वी च्या परीक्षेचे दोन पेपर नियोजित वेळेप्रमाणे येत्या शनिवारी आणि सोमवारी वेळापत्रकानुसार होणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
बालकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता या संदर्भातील शासनाने हा निर्णय घेतला आहे. पहिली ते आठवी पर्यंतच्या राज्यातील परीक्षा यंदा रद्द केल्या असून वर्षभरातील विद्यार्थ्यांचे मापन संकलित करून विद्यार्थ्यांना निकाल देण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री म्हणाल्या.
इयत्ता 9 वी आणि 11 वीच्या उर्वरित विषयांच्या परीक्षा 15 एप्रिलनंतर घेण्यात येणार. इयत्ता दहावीचे दोन पेपर नियोजित वेळेप्रमाणे येत्या शनिवारी आणि सोमवारी वेळापत्रकानुसार होणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
दहावीच्या परीक्षेसंबधित आवश्यकता असलेले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सोडून उर्वरित सर्वांनी घरीहून काम करावे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी बालकांनी आणि पालकांनी काळजी घ्यावी आणि शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत- शालेय शिक्षणमंत्री @VarshaEGaikwad यांची पत्रकार परिषदेत घोषणा. pic.twitter.com/KRYKbqf1jy
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 20, 2020





























































