गेवराईतील शेतकऱ्यांची ११ मुले झाली फौजदार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । गेवराई

राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत गेवराई तालुक्यातील ११ शेतकNयांची मुले फौजदार झाली आहेत. या पदावर एवढ्या संख्येने जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.

तालुक्यातील वासुदेव पवार (भेंड), अशोक माने (तलवाडा), श्याम वसंतराव वारंगे (मादळमोही), दीपक चव्हाण (जातेगाव), भरत बारगजे (वडगाव), अंकुश जाधव (कुंभारवाडी), विष्णू भांडवले (कुंभारवाडी), योगीता शंकर जंगले (भेंड), गणेश गिरी (खेर्डा), सखाराम एकनाथ कांबळे (पोखरी), विनोद पुंडलिक ठोंबरे (तळणेवाडी) आदींची पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली. अंबाजोगाई तालुक्यातील पट्टी वडगाव येथील शिवराज वैजनाथ जाधव तर शहरातील सिद्धांत शिवशंकर मस्के यांची उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. सिद्धांत हा स्वामी स्वाराती रुग्णालयातील कर्मचारी शिवशंकर यांचा मुलगा आहे.