स्वच्छ-सुंदर मुंबईसाठी 1200 कोटींचे कंत्राट पालिका पाच वर्षांसाठी देणार काम

स्वच्छ-सुंदर मुंबई बनवण्यासाठी पालिकेने तब्बल 1200 कोटींचे कंत्राट दिले आहे. यामध्ये पाच वर्षांसाठी हे काम दिले जाणार असून पालिकेने या कामासाठी निविदा मागवल्या आहेत. या निर्णयामुळे दत्तक वस्ती योजना बंद होण्याची शक्यता आहे.

मुंबई शहरात 60 टक्के मुंबईकर झोपडपट्टीत वास्तव्य करीत आहेत. ही झोपडपट्टी कचरा मुक्तीसाठी स्वतंत्र धोरण राबवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पालिकेच्या धोरणानुसार विशेषतŠ झोपडपट्टीतील कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण आणि डंपिंग ग्राऊंडपर्यंत कचरा पोहोचवण्याची जबाबदारी कंत्राटदारांवर सोपवण्यात येणार आहे. यासाठी निविदा मागवण्यात आल्या असून पात्र कंत्राटदाराला पाच वर्षांसाठी कंत्राट देण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

– या कामामध्ये झोपडपट्टी वस्तीमधील गल्ल्यांची सफाई, छोटय़ा गटारांची सफाईसाठी स्वतंत्र कंत्राटदार नेमण्यात येणार आहे. – झोपडपट्टी भागातील कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण आणि डंपिंग ग्राऊंडपर्यंत कचरा नेण्याची जबाबदारी या पंत्राटदारावर असेल. – झोपडपट्ट्यांमधील स्वच्छतागृहांच्या सफाईदेखील दिवसातून दोन ते तीन वेळा करावी लागणार आहे.