
डेहराडून विकासनगर येथे आज 1300 फूट खोल दरीत बस कोसळून झालेल्या अपघातात 13 जण ठार झाले असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नजीकच्या रुग्णालयात हलवले आहे. सकाळी 8 वाजता हा अपघात झाला. याची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना रुग्णालयात हलवले आहे. मदतीसाठी पोसकाळी 8 वाजता हा अपघात झाला.लीस आणि एसडीआरएफची टीम तत्काळ दाखल झाली असून मृतदेह बाहेर काढण्याचे काम हाती घेतले आहे. बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

























































