धाराशिवमध्ये आढळले कोरोनाचे 131 रुग्ण, 97 रुग्ण कोरोनामुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धाराशिव जिल्ह्यात आज कोरोनाचे 131 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण  कोरोना रुग्णांची संख्या 3 हजार 898 वर पोहोचली आहे. आज 97 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 1 हजार 485 रुग्णांवर आजही जिल्ह्यातील विविध कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

धाराशिव येथील जिल्हा सामान्य रुग्णलयातून संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तसेच धाराशिव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ उपकेंद्रातील कोरोना तपासणी प्रयोगशाळेत संशयीत रुग्णांचे 320 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या सर्व स्वॅबचा तपासणी अहवाल जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाला आहे. यामध्ये 176 निगेटीव्ह, 96 पॉझिटीव्ह, 48 अहवाल अनिर्णित आहेत. तसेच 527 अँटीजेन किट टेस्टींगमध्ये 35 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 131 झाली आहे.

जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांचा आकडा 3 हजार 898 झाला आहे. 2 हजार 307 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  1 हजार 485 रुग्णांवर विविध कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मागील 24 तासात 1 कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णाचा आकडा 106 वर पोहोचला आहे.