कोरोनानंतर लोकलच्या ई-तिकीटांची चलती, युटीएस अॅपवर सहा महिन्यांत 14 लाख तिकिटांची विक्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनानंतर लोक जागरूक होत असून पेपरलेस तिकीट बुकिंगला अधिक प्राधान्य देत आहेत. जादास जादा प्रवासी युटीएस मोबाइल तिकीटाच्या पर्यायाची निवड करीत आहेत. युटीएस मोबाईल अॅजपद्वारे मुंबई उपनगरीय लोकलची दैनंदिन तिकीटे व सिझन तिकिटांच्या खरेदीत सातत्याने वाढच होत आहे.

कोरोना विषाणू (कोविड-19) साथीमुळे गेल्या दोन वर्षांपासून जागतिक स्तरावर कोट्यवधी नागरिकांना फटका बसला आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि तिकीट खिडकीवरील गर्दी कमी करण्याची गरज व्यक्त होत आहे. यामुळे लोकलचे तिकीट खरेदी करण्यासाठी डिजिटल ई – तिकीट खरेदीचा वापर वाढला आहे.

कोविडचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या सर्वसामान्यांना ऑगस्ट महिन्यात लोकल प्रवासाची अनुमती दिल्याने रेल्वेची आयटी कंपनी ‘क्रिस’ने मोबाईलवरच लस प्रमाणपत्राचे व्हेरिफिकेशन करण्याचे तंत्र विकसित करीत तिकीट जारी करण्याचा अनोखा प्रयोग यशस्वी केला. तेव्हापासून युटीएस मोबाइल अॅटपद्वारे तिकीटे बुक करणार्याक प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढच होत आहे.

रोज सरासरी 54 हजार ई तिकीटांची विक्री

26 मे 2022 पर्यंत 14 लाख 20 हजार तिकिटांची युटीएस मोबाईल अॅेपद्वारे विक्री झाली असून एकूण 78 लाख 13 हजार प्रवाशांनी या ई-तिकिटांद्वारे लोकल मधून प्रवास केला. रोज सरासरी 54,635 ई-तिकिटांची विक्री होत असून 3 लाख 521 हजार प्रवासी रोज प्रवास करीत आहेत.

9.45 टक्क्यांनी वाढ

मार्च 2022 मध्ये कोविडपूर्व काळात युटीएस मोबाइल अॅिपवरून एकूण 12 लाख 79 हजार 95 ई -तिकीटांची विक्री झाली होती, तर एप्रिल 2022 मध्ये 14 लाख 60 हजार युटीएस तिकीटे बुक झाली आहेत. त्यामुळे ई – तिकीटांच्या बुकींगमध्ये सुमारे 9.45 टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

मोबाईल अॅ्पद्वारे तिकिटांची खरेदी व प्रवाशांची संख्या

महिना आणि वर्षे

डिसेंबर 2021
5,93,383
33,90,198

जानेवारी 2022
6,63,533
37,14,583

फेब्रुवारी 2022
9,52,357
52,36,957

मार्च 2022
11,28,133
67,23,541

एप्रिल 2022
14,00,060
74,39,176

मे 2022 (26 पर्यंत)
14,20,506
78,13,553