मान्सून पाऊस आणि पुरामुळे देशात १४०० हून अधिक लोकांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मान्सून आणि १० राज्यात झालेली अतिवृष्टी, पूर आणि भुस्खलनामुळे १४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये केरळमधील ४८८ जणांचा समावेश आहे. सोमवारी गृहमंत्रालयाने ही माहिती दिली आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार केरळमध्ये ४८८ लोकांचा मृत्यू झाला असून राज्याच्या १४ जिल्ह्यात ५४.११ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे.


पूरामुळे राज्यात १४.५२ लाख लोक विस्थापित झाले असून बचाव छावणीत त्यांनी आसरा घेतला आहे. तर दक्षिणेच्या राज्यात ५७ हजार २४ हून अधिक हेक्टरवरील पीक नष्ट झाले आहेत. सर्वाधिक नुकसान उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि महाराष्ट्रात या राज्यांत झाले आहे. १० राज्यांत पुर आणि इतर दुर्घटनांमुळे ३८६ लोक जखमी झाले आहेत. तर ८६ लोक बेपत्ता झाले आहेत.