मुंबईत पाशवी बलात्कार झालेल्या जालन्याच्या तरुणीचा अखेर मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई, चेंबूर परिसरातील लालडोंगर येथे राहणाऱ्या युवतीवर गँगरेप करण्यात आला होता. त्यामुळे तिची प्रकृती खालवल्याने संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात गेल्या 33 दिवसांपासून मृत्यूशी झंजू देत होती. बुधवारी रात्री उपचारदरम्यान पीडिताचा मृत्यू झाला.

घनसावंगी तालुक्यातील पीडिताचा भाऊ गेल्या वर्षाभरपूर्वी चेंबूर येथील लालडोंगरी परिसरात रोजगारासाठी गेला होता. पीडिता ही भावाकडे गेल्या काही महिन्यांपूर्वी गेली होती. जुलैमध्ये मैत्रिणीचा वाढदिवस असल्याचे सांगून पीडिता घराबाहेर पडली. त्यावेळी घरी येण्यास उशिर होणार असल्याचे वहिणीला सांगितले. दरम्यान वाढदिवसाला गेल्यावर त्या पीडितावर गँगरेप करण्यात आला. त्यात तिची प्रकृती खालवली होती. कमेरपासून खाली पाय धरत नसल्यामुळे पीडिताच्या भावाने आई – वडिलांना बोलवून घेतले. आई – वडिलांनी मुलीला पाहिल्यानंतर तिला उपचारासाठी घनसावंगी तालुक्यातील गावी आणले त्या नंतर उपचारासाठी संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचार करत असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांना शंका आल्यामुळे त्या पीडिताची अस्थेवाईकपणे चौकशी केली असता तिने गॅगरेप झाला असल्याचे सांगितले. दरम्यान या प्रकरणी बेगमपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बेगमपुरा पोलिसांनी शुन्याने हा गुन्हा चुन्नाभट्टी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. चुन्नाभट्टी पोलिस पीडिताच्या जबाब नोंदविण्यासाठी संभाजीनगरात आले. त्यानी पीडिताचा जबाब नोंदविण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची परवानगी घेतली मात्र पीडिताची प्रकृती साथ देत नसल्यामुळे जबाब नोंदविण्यात आला नाही. पीडिताची प्रकृती खालवल्यामुळे तीन दिवसांपूर्वी अतीदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार दरम्यान बुधवारी रात्री पीडिताचा मृत्यू झाला.

आरोपी मोकाटच
या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात आणि मुंबईतील चुनाभट्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी अजूनही मोकाट आहेत. चारही नराधमांना शोधण्यात अजूनही पोलीस अपयशी ठरले आहेत.