मॉलच्या पार्किंगमध्ये सापडला 19 वर्षीय टिकटॉक स्टारचा मृतदेह सापडल्याने खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

19 वर्षीय टिक टॉक स्टार कूपर नोरिगा याचा मृतदेह मॉलच्या पार्किंगमध्ये सापडल्याने एक खळबळ माजली आहे. गुरुवारी त्याचा मृत्यू झाला. लॉस एंजेलिस मॉलच्या पार्किंगमध्ये तो मृतावस्थेत आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या आकस्मिक निधनाने त्याचे चाहते दु:खी झाले आहेत. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मृत्यू होण्याच्या काही तास आधी त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. ज्यामुले त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कूपरने बुधवारी सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो बेडवर पडलेला दिसत होता. कूपरने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, मी तरुण वयातच मरेल याची कल्पना कोणाला आहे? या व्हिडिओला 13 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि 57 हजारांहून अधिक सॉरी कमेंट्स आल्या आहेत.

कूपरच्या नोरिगाच्या शरीरावर कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत, ज्यामुळे त्याच्यासोबत कोणत्याही प्रकारचा हिंसाचार झाला नसल्याचे दिसत आहे. मृत्यूच्या पाच दिवस आधी, कूपरने त्याच्या मानसिक आरोग्याबद्दल सांगितले होते. त्याने सोशल मीडियावर लिहिले की, मी वयाच्या 9 व्या वर्षापासून अंमली पदार्थांच्या व्यसनाशी लढत आहे. तुम्ही म्हणू शकता की मी वेडा आहे. एक पुनर्वसन केंद्र उघडण्याचे माझे उद्दिष्ट आहे. व्यसनाशी लढताना मी शिकलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे नकारात्मक लोक तुम्हाला नेहमी निराश करतात. म्हणूनच एका सुरक्षित ठिकाणाची तुम्हाला गरज आहे, जिथे लोक एकमेकांना कठीण प्रसंगी मदत करू शकतील.