
लातूरच्या निलंगा तालुक्यात सतत होणाऱ्या भुकंपांच्या मालिकेमुळे नागरीक भयग्रत झाले आहेत. दिनांक 9 ऑक्टोबर रोजी या भागात पुन्हा 2 भुकंपांची नोंद झालेली आहे. हे भुकंपाचे धक्के सौम्य असले तरी नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होत आहे.
निलंगा तालुक्यातील बडूर, औराद शहाजनी, हासोरी आणि परिसरातील गावांना भुकंपाचे धक्के जाणवत आहेत. येथे भुगर्भातून आवाज देखील येत आहेत. दिनांक 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजून 14 मिनीटांनी 2.1 रिश्टर स्केलच्या भुकंपाचा धक्का जाणवला. भूगर्भात 14 किलोमीटर अंतरावर याचा केंद्रबिंदू होता. त्यानंतर पुन्हा रात्री 9 वाजून 57 मिनिटांनी 1.9 रिश्टर स्केलचा धक्का जाणवला. त्याचा केंद्रबिंदू भूगर्भात 5 कि.मी. अंतरावर असल्याचे सांगण्यात आले. हे भुकंपाचे धक्के सौम्य असले तरी नागरिकांमध्ये भितीचे वातावरण दिसून येत आहे. दिल्ली येथून आलेल्या शास्त्रज्ञांनी या भागात सतत भुकंपाचे धक्के जाणवू शकतात, असे यापुर्वीच सांगीतले आहे.




























































