रिकाम्या इमारतीच्या गच्चीवर मृतदेह, तरुणीची बलात्कार करून हत्या; प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुर्ल्याच्या एचडीआयएल पंपाऊंडमधील इमारत क्रमांक 16 च्या गच्चीवर तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. पूर्णपणे रिकामी असलेल्या या इमारतीत बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. प्रियकर आणि त्याच्या मित्राने हे कृत्य केले असून दोघांनाही विनोबा भावे नगर पोलिसांनी अटक केली आहे.

25 तारखेच्या संध्याकाळी आजूबाजूच्या परिसरातील काही तरुण त्या इमारतीच्या सी विंगमधील गच्चीवर टिक टॉकचा व्हिडीओ बनविण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना तेथे तरुणीचा मृतदेह दिसला. त्यांनी लगेच पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क साधून तशी माहिती दिली. त्यानंतर विनोबा भावे नगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदन अहवालात मृत तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. तरुणीचे डोके व गळ्यावर चाकूने वार करण्यात आले होते. मृत तरुणीची ओळख पटली असून ती गोवंडी परिसरात राहणारी आहे. एचडीआयल पंपाऊंडमधील बहुतेक इमारती या रिकाम्या असून तेथे सीसीटीव्ही पिंवा सुरक्षा रक्षक तैनात नाहीत. हीच बाब लक्षात घेऊन तरुणीचा प्रियकर तिला घेऊन तेथे आला होता. सोबत प्रियकराचा मित्रदेखील होता.

दरम्यान, इमारतीच्या गच्चीवर नेऊन दोघांनी तिची हत्या केली. मृत तरुणीने लग्नासाठी प्रियकराच्या मागे तगादा लावला होता. त्यामुळे तिच्यापासून सुटका मिळावी   याकरिता प्रियकराने मित्राच्या मदतीने तिला कायमची संपवली. 23 तारखेला आरोपी तरुणीला घेऊन इमारतीत आले होते. अखेर विनोबा भावे पोलिसांनी गुह्याची उकल केली.