
सामना ऑनलाईन|धुळे
विठ्ठल नामाचा गजर करीत परिवहन महामंडळाने आषाढी एकादशीनिमित्त भाविकांच्या पंढरपूर वारीची पुर्वतयारी केली आहे. 7 ते 13 जुलै या काळात महामंडळाच्या धुळे विभागातून यंदा भाविकांना घेऊन 200 बस धावणार आहेत. पंढरपूर वारीनिमित्त बस 450 फेऱया करून सुमारे दोन लाख किलोमीटरचा प्रवास घडविणार आहे. या पंढरपूर वारीतून महामंडळाच्या धुळे विभागाने एक कोटी रुपयांची उलाढाल करण्याचा निर्धार केला आहे.
महाराष्ट्रात वारकऱयांची संख्या मोठी आहे. धुळे जिह्यातील अनेक ग्रामस्थ वारकरी आहेत. गावातील विठ्ठल मंदिरात भजनी मंडळांकडून नेहमीच कीर्तन सप्ताहाचे कार्यक्रम होतात. विठ्ठल नामाचा गजर करताना अनेक भाविक आषाढी एकादशीला पंढरपूर येथे जाऊन विठ्ठलाच्या चरणी लीन होण्याचे स्वप्न बाळगतात. आषाढी एकादशी जवळ आल्याने अनेक भाविकांनी पायी दिंडीत सहभागही नोंदविला आहे, पण अनेक ज्येष्ठ भाविक पायी दिंडीत सहभागी होऊ शकत नाही, मात्र अशा भाविकांकडून पंढरपूरला जाण्यासाठी परिवहन महामंडळाच्या बसला पसंती दिली जाते. विठ्ठलभक्तांची पंढरपूर वारी करण्यासाठी परिवहन महामंडळाने यंदाही जय्यत तयारी केली आहे. गेल्या वर्षी धुळे विभागाने भाविकांना 170 बस उपलब्ध करुन दिल्या होत्या. परंतु दरवर्षी वारकऱयांची संख्या वाढत असल्याने यंदा धुळे विभागाने दोनशे बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
आगाराला एक कोटीची उलाढाल उपेक्षित
धुळे विभागाच्या निरनिराळय़ा आगारांतून 7 ते 13 जुलै या काळात या बस पंढरपूरची वारी करतील. यंदा पंढरपुरला धावणाऱया दोनशे बस किमान 450 फेऱया करतील. या फेऱयांमधून 1 लाख 94 हजार किलोमिटरचा प्रवास घडविला जाईल. सुमारे 75 हजार भाविक महामंडळाच्या बसने पंढरपूर वारी करतील. भाविकांच्या या वारीतून महामंडळाच्या धुळे आगाराला एक कोटी रुपयांची उलाढाल होणे अपेक्षित आहे.




























































