अफगाणिस्तानमधील शीख बालकाला विना पासपोर्ट हिंदुस्थानात आणले, 237 हिंदुस्थानी मायदेशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर परिस्थिती बिघडली आहे. आज 237 हिंदुस्थानी मायदेशी परतले आहेत. हिंदुस्थानने अफगाणिस्तानच्या एका शीख बालकाला पासपोर्टशिवाय एअरलिफ्ट केले आहे. एअर इंडिया, इडिंगो विमानांतून हिंदुस्थानी मायदेशी परतत असून अजून एका विमानाने 75 हिंदुस्थानी परतणार आहेत.

इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांनी 237 हिंदुस्थानी काबुलहून दिल्लीत आले आहेत. एअर इंडियाच्या विमानात 87 तर इंडिगो विमानातून 60  जण हिंदुस्थानात परतले आहेत. विस्ताराच्या विमानातून 75 हिंदुस्थानात येणार आहेत. इंडिगो आणि एअर इंडियातून परतेल्या नागरिकांची
RTPCR चाचणी होणार आहे.


तर  अफगाणिस्तानात परिस्थिती बिघडल्यानंतर हिंदुस्थानी नागरिकांना देशात आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. रविवारी सकाळी हवाई दलाचे सी-17 विमान काबुलहून हिंदुस्थानात आले आहे. त्यात 168 प्रवासी असून 107 हिंदुस्थानी नागरिक होते. हे विमान गाझियाबादमध्ये उतरले आहे. कजाकिस्तानच्या मार्गाने 94 जण दिल्लीत पोहोचले आहेत. त्यात 87 नागरिक हिंदुस्थानचे, दोन नेपाळचे तर 5 राजदुतांचा समावेश आहे.

हिंदुस्थानने अफगाणिस्तानमधील एक शीख धर्मीय बालकाला पासपोर्टशिवाय एअरलिफ्ट केले आहे. तर दुसरीकडे विस्ताराचे एक विमान कतार मार्गे येणार आहे. या विमानातू 75 हिंदुस्थानी परतणार आहेत.