2400 चौरस फुटाचे घर मोफत द्या! मोतीलालनगरच्या रहिवाशांचे उद्या धरणे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोतीलालनगरच्या पुनर्विकासाचा मे. अदानी प्रॉपर्टीज लिमिटेड आणि म्हाडा यांच्यातील करार बेकायदेशीर असून प्रकल्प अहवालानुसार रहिवाशांना किमान 2400 चौ. फुटांचे मोफत घर, अनिवासी गाळे धारकाला किमान 2070 चौ. फुटांचा गाळा मोफत व प्रत्येकी 30 लाखांचा कॉर्पस फंड मिळाला पाहिजे, या मागण्यांसाठी गोरेगावच्या मोतीलालनगर विकास समितीच्या वतीने 16 जुलैला दुपारी 12 वाजता आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

मोतीलालनगरच्या रहिवाशांना 2400 चौ. फूट कार्पेट एरिया आणि 30 लाख कॉर्पस सहज मिळू शकतो, असे आर्किटेक्टने अभ्यासानंतर सांगितले आहे. म्हणून ही मागणी रास्त व योग्य आहे. त्यामुळे या पुनर्विकासात त्यांना 500 चौ. फुटांचे चार फ्लॅट मिळालेच पाहिजे, अशी समितीची मागणी आहे.