
बेस्टच्या ताफ्यात टाटा मोटर्सच्या भाडेतत्वावरील 26 वातानुपूलित इलेक्ट्रिक बसेस शुक्रवारी दाखल झाल्या असून बसेस सध्या काही मोजक्याच मार्गांवर चालविण्यात येणार आहेत. या बसेस चार्जिंग करण्यासाठी सुविधा उपलब्ध झाल्यानंतर अन्य मार्गाची निवड करण्यात येणार आहे.
सध्या या इलेक्ट्रिक बसेसना मार्ग क्र. 25 मर्यादित (शीव ते पुलाबा), मार्ग क्र.121 (जे. मेहता मार्ग ते नेपियन्सी रोड आणि बॅकबे ते पुलाबा) तसेच मार्ग क्र. 137 चर्चगेट ते पुलाबा या मार्गांवर चालविण्यात येणार आहेत. या बसेसना चार्ंजग केल्यानंतर त्या 200 कि.मी.पर्यंत धावू शकतात. त्यानंतर त्यांना पुन्हा चार्ंजग करावे लागते. सध्या बॅकबे डेपो आणि धारावी डेपो येथे चार्ंजगची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे या बसेसच्या मार्गांवर मर्यादा पडल्या आहेत. टाटा पंपनी बॅकबे, वरळी, मालवणी आणि शिवाजी नगर अशा मुंबईतील चार डेपोतील बसेससाठी स्वतंत्र चार्ंजग स्टेशन उभारणार आहे. या स्टेशनची उभारणी, देखभाल व ती चालवण्याचे कामही कंपनी करणार आहे. ही चार्ंजग स्टेशन तयार होईपर्यंत या बसेसच्या फेर्यांना मर्यादा येणार आहे. बेस्टमध्ये यापूर्वी भाडे तत्वावरील 40 आणि बेस्टच्या मालकीच्या 6 इलेक्ट्रीक बसगाडय़ा बेस्टच्या ताफ्यामध्ये कार्यरत आहे. बेस्टमध्ये भाडेतत्वावरील 340 इलेक्ट्रीक बस दाखल होणार आहेत. त्यापैकी भाडय़ाच्या 26 बसेस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे भाडेतत्वावरील इलेक्ट्रीक बसची संख्या आता 66 झाली असून बेस्टच्या मालकीच्या सहा इलेक्ट्रीक बस आहेत.
































































