विद्यार्थ्यांना फॅशन डिझायनिंग, कोडिंग, ऑटोमोबाईलचे धडे, कौशल्य विकास उपक्रमांतर्गत 28 कोटींची तरतूद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता फॅशन डिझायनिंग, कोडिंग, इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल, इंटलेक्च्युअल इंटेलिजन्ससारख्या व्यवसायाच्या संधी देणारे शिक्षण देण्यात येणार आहे. कौशल्य विकास उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱया या उपक्रमासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात पालिकेने 28.45 कोटींची तरतूद केली आहे. या वर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण सहआयुक्त अजित पुंभार यांनी दिली. या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी आठवडाभरात टेंडर काढण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि अद्ययावत सुविधा देण्यात येत आहेत. तसेच विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी ‘मिशन अॅडमिशन’ मोहीम राबविण्यात येत असून पहिल्याच वर्षी पालिका शाळेतील विद्यार्थी संख्या सुमारे सवा लाखाने वाढून चार लाखांवर पोहोचली आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षण घेतानाच व्यवसायाचे शिक्षण मिळावे आणि त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

असा होणार फायदा
> पालिका शाळांत शिकणाऱया गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना या व्यावसायाभिमुख शिक्षणामुळे उच्च शिक्षण सुरू असताना किंवा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पार्टटाइम पिंवा फुलटाइम रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

> ज्यामुळे त्यांना नोकरीसाठी पैसे खर्च करून वेगळा खर्च करण्याची गरज भासणार नाही. पालिका शाळांत येणारे बहुतांशी विद्यार्थी हे गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील असल्यामुळे या उपक्रमाचा फायदा होणार आहे.

> यासाठी संबंधित विषयातील तज्ञांची नियुक्ती पालिकेकडून शाळांसाठी केली जाणार आहे. सुरुवातीला पालिकेच्या 100 शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जाईल. यानंतर पालिकेच्या सर्व 1100 शाळांमध्ये या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.