48 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 6 GB RAM असलेला Samsung Galaxy M32 5G लॉन्च, किंमत आहे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

Samsung ने नुकताच Galaxy M32 5G हा फोन हिंदुस्थानमध्ये लॉन्च केला आहे. या फोनमध्ये 5G असून त्यात ऑक्टा-कोर मीडियाटेक प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला असून 6 GBचा RAM देण्यात आला आहे.

Samsung Galaxy M32 5G या फोनमध्ये लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम 11 देण्यात आली आहे. फोनमध्ये ऑक्टार कोर मीडियाटेक डायमेनसिटी 720 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 8 GBचा RAM असून इंटर्नल मेमरी 128 GB देण्यात आली आहे.

फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला असून 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, दोन मेगापिक्सलचा मायक्रो आणि डेप्थ शूटरही देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 13 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5,000mAh क्षमतेची बॅटरी असून 15 वॅट फास्ट चार्जर देण्यात आला आहे.

हिंदुस्थानमध्ये या फोनची किंमत 20 हजार 999 इतकी आहे. 2 सप्टेंबर पासून या फोनची विक्री ऍमेझॉनवर सुरू होणार आहे. ICICI क्रेडिट कार्डवर 2 हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे.