
पीव्हीआर-आयनॉक्स मल्टिप्लेक्स चेनला मार्चअखेरच्या तिमाहीत 333 कोटींचा तोटा झाला आहे. त्यामुळे आता कंपनीने एक मोठा निर्णय घेतला असून पुढील सहा महिन्यांत 50 सिनेमा स्क्रिन्स बंद करण्यात येणार आहे. या स्क्रीन्स तोटय़ात चालतायत किंवा मॉल्समधील आहेत. या स्क्रीन्स पुनर्जीवित होण्याची शक्यता कमी असल्यामुळे त्या बंद करण्यात येणार आहेत, असे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे.






























































