दुचाकीस्वार तरूणाकडील 60 हजारांची रोकड लुटली

दुचाकीस्वार तरूणाचा पाठलाग करून त्यांच्या खिशातील 60 हजारांची रोकड चोरट्यांनी लुटून नेली. ही घटना काल मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास हडपसरमधील सिरम कंपनीसमोरील रस्त्यावर घडली. याप्रकरणी पारप्पा बनसोडे (वय 30, रा. केशवनगर, मुंढवा)  यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

काल मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास पारप्पा दुचाकीवरून कार्यालयाकडे चालले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघा चोरट्यांनी पारप्पा अडवून त्यांच्या खिशातील 60 हजारांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. पारप्पा यांनी आरडाओरडा करेपर्यंत चोरट्यांनी दुचाकीवरून पळ काढला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या