5 दिवसांत 300 किमी सायकल भ्रमंती, 65 वर्षीय सतीश विष्णू जाधव यांचा विश्वविक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महापालिकेतून प्रशासकीय अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले 65 वर्षीय सतीश जाधव यांनी विश्वविक्रम केला आहे. धारचुला ते आदि पैलास, ॐ पर्वत आणि परत धारचुला ही 300 किमीची सायकल वारी त्यांनी एकटय़ाने पाच दिवसांत पूर्ण केली आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल ‘ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेतली आहे.

लोअर परळ येथील आर्य समाज सभागृहात ‘ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड’चे संचालक डॉ. दिनेश गुप्ता यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. ‘प्रदूषणमुक्त हिंदुस्थान’चा संदेश घेऊन सायकल भ्रमंती करणारे सतीश जाधव आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, ‘सायकलिंगमुळे शरीर स्वास्थ्य उत्तम राहते, तसेच पर्यावरणाचे प्रदूषणसुद्धा कमी होते. शिवाय निसर्गात रममाण होऊन जीवन आनंदमय होते. म्हणून तरुण पिढीने मोबाईल संस्कृतीमधून बाहेर येऊन सायकलिंगसह निसर्गाचा आनंद लुटावा.’